शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राफेल सौद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी; करार संसदेपुढे का आणला नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 2:49 AM

भारतीय हवाई दलासाठी दसॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स सरकारांदरम्यान झालेल्या कराराच्या विरोधात केल्या गेलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलासाठी दसॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स सरकारांदरम्यान झालेल्या कराराच्या विरोधात केल्या गेलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे.अ‍ॅड. विनीत धांडा यांनी यासंदर्भात केलेली नवी याचिका सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे आली असता ती याआधी केलेल्या याचिकेसोबत बुधवारी सुनावणीस घेण्याचे निर्देश देण्यात आले. याआधीची याचिका अ‍ॅड. एम. एल. शर्मा या आणखी एका वकिलाने केली आहे.राफेल कराराचा सर्व तपशील व आधीच्या ‘संपुआ’ सरकारने केलेला करार व आता केलेला करार यात विमानांच्या किमतीत किती व का फरक आहे, याची माहितीही जाहीर करण्याचा आदेश सरकारला द्यावा, एवढीच मर्यादित विनंती अ‍ॅड. धांडा यांच्या याचिकेत आहे. अ‍ॅड. शर्मा यांच्या याचिकेची व्याप्ती याहून जास्त असून, त्यात आताचा राफेल करार हा ‘भ्रष्टाचारातून’ झालेला असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन सरकारांदरम्यान झालेला हा करार मंजुरीसाठी संसदेपुढे का आणण्यात आला नाही, तसेच २३ सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्यक्ष करार करण्याआधी रूढ प्रक्रियेनुसार त्यास आधी मंत्रिमंडळाची मंजुरी का घेण्यात आली नाही, असे प्रश्नही त्यात उपस्थित केले गेले आहेत.काय आहे करार?मोदी सरकारने केलेल्या करारानुसार भारत ३६ राफेल विमाने पूर्णपणे तयार स्वरूपात घेणार असून, बाकीच्या विमानांचे उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरणाने भारतात करण्यात येणार आहे. त्यासाठी दसॉल्ट आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्सने स्वतंत्र कंपनी काढून नागपूर येथे कारखाना उभारणे सुरू केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRafale Dealराफेल डील