मिर्जापूर - रामपूर अटारी गावात एका शाळेत दुपारच्या गरम - गरम जेवणाच्या भांड्यात पडल्याने 3 वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण बनविणाऱ्या महिलेने कानात इयरफोन घातले होते, त्यामुळे मुलीच्या रडण्याचा आवाज आला नाही. त्यांना काहीच कळले नाही आणि जेव्हा कळाले तेव्हा त्या घाबरून पळून गेल्या.
उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रामपूर अटारी गावात शाळेच्या दुपारच्या जेवणाच्या गरम भाजीच्या पातेल्यात ३ वर्षीय मुलगी पडली. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेवण बनविणाऱ्या महिलेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. महिला कानात इयरफोन घालून गाणी ऐकत होती. जिल्हाधिकारी यांनी मुख्याध्यापकास निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बांधकाम साहित्यामुले अडखळून तीन वर्षाची मुलगी भाजीच्या पातेल्यात पडली, असे आघाडीच्या दैनिकात नमूद करण्यात आले आहे. मृत मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, स्वयंपाक करणाऱ्या महिलेने पातेल्यात पाहिले नाही कारण तिच्या कानात इयरफोन चालू होते.काय घडले हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा ती “घाबरून” गेली, असे एएनआयने म्हटले आहे.पीडित मुलगी शालेय विद्यार्थी नव्हती, अशी माहिती मिरजापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सोमवारी दिली. पण नाव न घेण्यास घेण्याच्या अटीवर एका अधिका्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, ती आस्थापनेशी संलग्न असलेल्या अंगणवाडीत शिकत होती. पूर्व उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरापासून काही तासाच्या अंतरावर रामपूर अटारी गावात ही शाळा आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी सुशील कुमार पटेल यांनी सोमवारी सांगितले की, मुख्याध्यापकांना त्वरित निलंबित केले जाईल. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याला एफआयआर दाखल करण्यास सांगितले, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे नोव्हेंबरमध्ये बालवाडीच्या एका विद्यार्थ्याचा नोव्हेंबरमध्ये मृत्यू झाला होता. गरम सांभारच्या पातेल्यात पळताना पडून मृत्यू झाला होता.