हृदयद्रावक! आधी आईची माया, मग वडिलांचं हरपले, खचलेल्या तरुणानं स्वत:ला ट्रेनसमोर झोकून दिले, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:28 IST2024-04-25T16:27:20+5:302024-04-25T16:28:05+5:30
Madhya Pradesh News: आधी देवानं त्याच्यावरील आईची माया हिरावून घेतली. त्यानंतर डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. राहायला घर नाही. खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत आयुष्याला कंटाळून त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही मरणानं पाठ फिरवली आणि आता अपंगत्वासह संपूर्ण जीवन जगण्याची वेळ एका तरुणावर आली आहे.

हृदयद्रावक! आधी आईची माया, मग वडिलांचं हरपले, खचलेल्या तरुणानं स्वत:ला ट्रेनसमोर झोकून दिले, मग...
आधी देवानं त्याच्यावरील आईची माया हिरावून घेतली. त्यानंतर डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. राहायला घर नाही. खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत आयुष्याला कंटाळून त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही मरणानं पाठ फिरवली आणि आता अपंगत्वासह संपूर्ण जीवन जगण्याची वेळ एका तरुणावर आली आहे. राकेश शाक्यवार असं या तरुणाचं नाव असून, तो सध्या ग्वाल्हेरमधील रुग्णालयात उपचार घेत आहे.
गरीब कुटुंबात जन्मलेला राकेश हा ७ वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. आई गेली तरी वडिलांचा आधार होता. त्यांनी कसंबसं राकेशचं पालनपोषण केलं. हळुहळू राकेश मोठा झाला. मात्र तो स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. आईची माया आणि वडिलांचं छत्र डोक्यावरून हरपल्याने राकेश अनाथ झाला. त्याच्याकडे राहण्यासाठी ना घर होतं ना खाण्यासाठी अन्न. आई-वडिलांविना पोरक्या झालेल्या राकेशने ग्वाल्हेर स्टेशनलाच आपलं घर आणि प्लॅटफॉर्मला आपलं अंथरुण बनवलं.
दिवसभर मोलमजुरी करून तो रात्री प्लॅटफॉर्मवर झोपायचा. मेहनत करून मिळालेल्या पैशांमधून तो आपलं पोट भरायचा. मात्र या जीवनाला तो कंटाळला. त्याने जीवन संपवण्याचा विचार केला. २३ एप्रिल रोजी त्याने ग्वाल्हेर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. ३ वर झाशी-इटावा लिंक एक्स्प्रेस आली असताना त्याने ट्रेनसमोर उडी मारली. ट्रेनखाली तरु येत असल्याचे पाहून ड्रायव्हरने ब्रेक लावला. मात्र तोपर्यंत राकेशचे दोन्ही पाय ट्रेनखाली सापडून तुटले.
तिथे उपस्थित असलेल्या जीआरपी आणि हमालांनी त्याला ट्रेनखालून बाहेर काढले. उपचारांठी त्याला जनारोग्य रुग्णालयात नेण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात आले. पण या घटनेत राकेश त्याचे पाय गमावून बसला. त्यामुळे आतापर्यंत स्वत:च्या पायावर उभा राहून कमावणाऱ्या राकेशचं पुढील जीवन आता आणखीनच कठीण बनलं आहे.