शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका!

By admin | Published: May 29, 2015 12:09 AM

पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो,

नवी दिल्ली : देशभरात सध्या आलेली उष्णतेची लाट म्हणजे धोक्याचा इशारा आहे. पृथ्वीवरील सातत्याने वाढत्या तापमानामुळे भविष्यात यापेक्षाही भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंटने (सीएसई) गुरुवारी वर्तविली.मागील पंधरवड्यात देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेने दोन हजारांवर लोकांचे बळी घेतले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये याची भीषणता अधिक असून येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.हवामानाशी संबंधित आकडेवारीनुसार मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे (तापमानात वाढ) २०१४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष राहिले. भारतातील सर्वात उष्ण १० वर्षांपैकी ८ वर्षे ही २००१ ते २०१० या दशकातील आहेत आणि त्या अनुषंगाने हे सर्वात उष्ण दशक ठरले आहे, असे सीएसईने अधोरेखित केले आहे. पृथ्वीवरील तापमानात मागील १०० वर्षांत सरासरी ०.८ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली असल्याने उष्णतेच्या लाटा आणखी वाढण्याची शक्यता आहे, असाही इशारा संघटनेने दिला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. अहमदाबाद व दिल्लीत अलीकडेच रात्री ३९ व ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेचा कालावधी दरवर्षी पाच दिवसांवरून ३० ते ४० दिवस एवढा वाढू शकतो. २०१० च्या तुलनेत २०१५ साली उष्णतेच्या लाटेचा कालावधी कमी राहिला असला तरी यंदा मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सीएसईच्या हवामान बदलविषयक कार्यक्रमाचे व्यवस्थापक अर्जुन श्रीनिधी यांच्या सांगण्यानुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बराच काळ तापमान कमी राहिल्यानंतर अचानक झालेला बदल हे यामागील कारण असू शकते. उष्णतेच्या या अभूतपूर्व लाटेनंतर आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला वैद्यकीय मदतीसह इतर सहकार्य केले आहे. या क्षेत्रात उष्णतेने १२०० लोकांचा बळी घेतला. मंत्रालय सर्व राज्यांना सतर्कतेची सूचनाही देऊ शकते. ४तीन दशकांमध्ये एखाद्या ठराविक दिवशी सरासरीपेक्षा पाच अथवा त्यापेक्षा अधिक अंश तापमानाची नोंद होते तेव्हा उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. ४शहरांमध्ये वाढलेली काँक्रीटची जंगले व हिरवळ व वृक्षांची कमतरता यामुळे तापमान वाढीचा अधिक त्रास होतो. याला ‘अर्बन हीट आयलँड इफेक्ट’ असे म्हणतात. यामुळे जेवढे तापमान असते त्यापेक्षा तीन ते चार अंश अधिक जास्त असल्याचे जाणवते.