उष्णतेची लाट पारा ४४ अंश सेल्सीअसवर : दोन दिवसात तीन अंश सेल्सीअसने वाढ
By admin | Published: April 16, 2016 12:35 AM
जळगाव- जिल्ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली.
जळगाव- जिल्ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली. उष्णतेची लाट आल्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शुक्र्रवारी दिसून आले. तर तेलबिया संशोधन केंद्राच्या ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागामध्ये ४२ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. गुरुवारी जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर ४३ अंश सेल्सीअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. अर्थातच एक दिवसात एक अंश सेल्सीअसने तापमानामध्ये वाढ झाली आहे. मागील मोसमात होते ३२ अंश सेल्सीअस तापमानमागील मोसमात म्हणजेच १५ एप्रिल २०१५ रोजी कमाल तापमान फक्त ३२ अंश सेल्सीअस एवढे होते. अर्थातच १५ एप्रिल २०१६ च्या कमाल तापमानाची तुपला मागील मोसमाशी तुलना केली तर तब्बल १२ अंश सेल्सीअस तापमान अधिक होते. रस्ते निर्मनुष्यउष्णतेची लाट असल्याने रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. सुट्या असूनही बाजारात फारशी गर्दी दुपारनंतर दिसली नाही. उष्ण वार्यांपासून संरक्षण करण्यासाठी बागायतदार रुमाल, टोप्यांचा वापर करताना अनेक वाहनधारक, पादचारी दिसून आले. तसेच शीतपेयांच्या दुकानांवरही मोठी गर्दी दिसून आली. कार्यालयांमध्ये पंखे सुरू असतानाही घामाच्या धारा निघत होत्या. पुढील तीन दिवसही धोक्याचेसध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे उष्ण वारे वाहत आहेत. ही लाट आणखी तीन ते चार दिवस कायम राहील, असा अंदाज तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सुदाम पाटील यांनी वर्तविला आहे. तापमानाची माहितीतापमान अंश सेल्सीअसमध्येएप्रिल २०१५एप्रिल २०१६११ एप्रिल ४०४०.२१२ एप्रिल ३९ ४०.६१३ एप्रिल ३८ ४२.३१४ एप्रिल ३३ ४३१५ एप्रिल ३२ ४४