शिमला: मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मागील 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या 130 दिवसांत राज्यात 432 लोकांना पावसामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती जारी केली आहे.
कोर्टाच्या आवारात गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या, दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काउंटर
एचपीडीएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातांत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर नऊ गोठ्यांसह 15 पेक्षा जास्त घरं कोसळली आहेत. पावसामुळे राज्यातील 123 रस्ते बंद झाले आहेत.
'या' ठिकाणी दर 90 मिनिटांनी सूर्य उगवतो आणि मावळतो, NASA ने दिली माहिती
पावसामुळे 1,108 कोटी रुपयांचे नुकसान
राज्यात अतिवृष्टीमुळे 1,108 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यापैकी सुमारे 745 कोटींचे शेती आणि फलोत्पादन क्षेत्रात नुकसान झालं आहे. एचपीडीएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. एचपीडीएमएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अद्याप 12 जण बेपत्ता आहेत. त्याचबरोबर गेल्या 130 दिवसात 857 घरे आणि सुमारे 700 गोशाळा कोसळल्या आहेत.