कर्नाटकचे आईटी हब असलेले बेंगळुरू सध्या पावसाचा सामना करत आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाले ओव्हरफ्लो झाले असून अनेक ठिकाणी गाड्याही अडकल्या आहेत. या पावसामुळे बेंगळुरूतील अनेक आयटी कंपण्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. महत्वाचे म्हणजे, या शहरात गूगल, अडोब आणि इंफोसिस सारख्या मोठ मोठ्या आयटी कंपन्या आहेत.
IT कंपन्यांना मोठा झटका -पावसामुळे येथील आयटी कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका आकडेवारीनुसार, या IT कंपन्यांकडून सरकारला सुमारे 64 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. हा आकडा साधारणपणे कर्नाटकच्या GDP च्या 25 टक्के एवढा आहे. या कंपन्यांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील लोकांचे सरासरी उत्पन्न अधिक आहेत. मात्र, आता कर्नाटकातील पावसामुळे याच आयटी कंपन्यांना 225 कोटी रुपयांचा फटका सबला आहे. पावसामुळे येथील लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेही आवघड होत आहे.बेलांदूर, सरजापुरा रोड, व्हाइटफील्ड, आउटर रिंग रोडला पावसाचा सर्वाधिक फटका - कर्नाटकातील पावसाचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, त्यांत गाड्यांपेक्षा अधिक जेसीबी दिसत आहेत आणि ऑटोची जागा ट्रॅक्टरने घेतल्याचे दृष्य आहे. लोक ट्रॅक्टनेच ऑफिसात जाताना दिसत आहेत. सध्या पावसाचा सर्वाधिक फटका बेलांदूर, सरजापुरा रोड, व्हाइटफील्ड, आउटर रिंग रोड आणि BEML लेआउटला बसला आहे. यापूर्वी, 30 ऑगस्टला शहरात मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. तसेच, 9 सप्टेंबरपर्यंत कर्नाटकात पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.