बंगळुरू: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागून राहिलेल्या मान्सूनच्या नुसत्या आगमनामुळेच कर्नाटकला मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकमध्ये यंदा मान्सूनचे वेळेपेक्षा लवकर आगमन झाले. सोमवारी रात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी पावसाने काही वेळासाठी उसंतही घेतली होती. मात्र, 9.30 वाजल्यापासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळायला सुरूवात झाली. याचा सर्वाधिक फटका मंगळुरू शहराला बसला आहे. पहिल्याच पावसात येथील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत यंत्रणांना पाचारण करण्याची वेळ ओढावली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साठले आहे. तर मुसळधार पावसामुळे मंगळुरू विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता उद्या शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
VIDEO: कर्नाटकमध्ये आगमनाच्या दिवशीच मान्सूनचा कहर; वाहतूक ठप्प; शाळांना उद्या सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 9:59 PM