मुंबई: सातारा आणि रायगड जिल्ह्यातील 36 मृतांसह भूस्खलन आणि पुरामुळे जीव गमावणाऱ्यंची संख्या 149 वर पोहोचली आहे. तर, 64 जण अजूनही बेपत्ता आहेत. महाराष्ट्रासह तिकडे कर्नाटक आणि गुजरातमध्येहीपाऊस आणि पुराने थैमान घातले आहे.
पश्चिमी महाराष्ट्र आणि कोकणातील पुरग्रस्त भागातून 2,29,074 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, रविवारी पाऊस थांबल्यानंतर बचावकार्यात वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी चिपळूणचा दौरा केला आणि नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच, परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात-लवकर मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र सरकारने सांगितल्यानुसार, रायगडमध्ये 60, रत्नागिरी 21, सातारा 41, थाणे 12, कोल्हापूर 7, मुंबई 4 आणि सिंधुदुर्ग व पुण्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकाला पुराचा फटकामहाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. कृष्णा, घाटप्रभा, भद्रा, तुंगा आणि इतर नद्या तुडूंब भरुन वाहत आहेत. आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी शिमोगा जिल्ह्यातील होलिहोंणुरूमध्ये एक 70 वर्षीय वृद्ध महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली. कर्नाटकातील 283 गावांना पुराचा फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील एक आठवडा राज्यात मुसळधार पाऊस इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये पावसाचं थैमानयेत्या 24 तासात गुजरातमध्ये सौम्य ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सौराष्ट्र, मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात हवामान विभागाने उत्तर गुजरात, मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे 55 मार्ग बंद करण्यात आले आहेत. यात, उदयपुरमध्ये 19, तापीमध्ये 3, वलसाडमध्ये 24, दांगमध्ये 2 रस्ते बंद आहेत.