काल रात्रिपासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचले असून नव्या संसदेतही पाणी साचले आहे. संसदेतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. संसदेच्या नवीन इमारतीत पाणी साचल्यानवरुन काँग्रेसने आरोप केला आहे. याबाबत काँग्रेसने नोटीसही दिली आहे. काँग्रेसने संसदेत पाणी साचण्यावर प्रश्न उपस्थित करत ही नोटीस दिली आहे.
तामिळनाडूच्या विरुधुनगर मतदारसंघाचे काँग्रेस खासदार मणिकम टागोर बी. नोटीस दिली. "या सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडण्याची परवानगी घेण्याचा माझा हेतू मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल."
Video: नव्या संसदेच्या छताला गळती; टपटप... पाणी साचविण्यासाठी खाली ड्रम ठेवला
लोकसभा अध्यक्षांना हे पत्र लिहिले आहे. या पत्रात माणिकम टागोर यांनी लिहिले आहे की, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर मी माझी चिंता व्यक्त करत आहे. कालच्या पावसानंतर संसद भवनाच्या लॉबीमध्ये पाणी शिरले आणि अनेक ठिकाणी पाणी साचले. भारताचे राष्ट्रपती ज्या मार्गाने नवीन संसद भवनात प्रवेश करत होते त्या मार्गाची समस्या आहे. इमारत बांधून वर्षभराचा कालावधी लोटला असतानाही या घटनेमुळे सध्याच्या समस्यांवर प्रकाश पडतो.
नवीन इमारतीची तपासणी करण्याची मागणी
मनिकम यांनी पुढे लिहिले की, या समस्येचा सामना करण्यासाठी मी सर्व पक्षांच्या खासदारांचा समावेश असलेली एक विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देतो, जी इमारतीची सखोल तपासणी करेल. पाणी गळतीच्या कारणांवरही समिती लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय इमारतीच्या डिझाइन आणि साहित्याचेही मूल्यमापन केले जाणार आहे. यानंतर, आवश्यक दुरुस्तीची शिफारस केली जाईल.
"मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, आपल्या संसदेची सुरक्षा आणि अखंडता राखण्यासाठी या उपक्रमाला पाठिंबा द्यावा", असंही यात म्हटले आहे. या नोटीस पत्राची प्रत लोकसभा अध्यक्षांना, संसदीय कामकाज मंत्रालयालाही पाठवण्यात आली आहे.