नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसाचे थैमान सुरू आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाचा (एनएच-५) ५० मीटरचा भाग वाहून गेला तर हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरडी कोसळल्याने एनएच-५ हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर काश्मीरमध्ये गंदेरबल भागात ढगफुटी झाली. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पहाटे चार वाजेपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. संततधार पावसामुळे पिंकसीटीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
निम्म्या उत्तर प्रदेशात अपुऱ्या पावसाने चिंतालखनौ : उत्तर प्रदेशातील एकूण ७५ पैकी ४० जिल्हे चांगल्या पावसासाठी आसुसले आहेत. या जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीहून खूप कमी पाऊस झाला आहे. तर शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सरकार खंबीरपणे पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
तेलंगणात मदतकार्याला वेगहैदराबाद : तेलंगणात शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मदत आणि बचाव कार्याला वेग आला असून पावसाशी संबंधित दुर्घटनांतील मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे.