केरळमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; ११ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:12 AM2018-06-11T05:12:25+5:302018-06-11T05:12:25+5:30
केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे.
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने मरण पावलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे. नेय्यतिकारा येथे जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एक जण रविवारी मरण पावला, तर अलप्पुझा येथे एकाचा नदीत बुडून मृत्यू झाला.
मुसळधार पावसाने इडुक्की, कन्नूर आदी जिल्ह्यांतील पिके व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात नेमकी किती हानी झाली आहे त्याची पाहणी करण्यात येत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संततधारेमुळे इडुक्की जिल्ह्यातील वाहतूक कोलमडली आहे. अनेक झाडे पडली आहेत. पावसामुळे नागरिकांना कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत असून त्यांच्यासाठी कडिनमकुलम येथे मदतछावणी उभारली असून, त्यात ४० जणांच्या निवाºयाची सोय करण्यात आली आहे.