हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:34 AM2023-07-12T10:34:57+5:302023-07-12T10:36:13+5:30

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे.

heavy rains wreak havoc in himachal uttarakhand condition of up-punjab is also bad 91 people died | हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू

हाहाकार! हिमाचल-उत्तराखंडमध्ये पावसाचा प्रकोप; यूपी-पंजाबची स्थितीही बिकट, 91 जणांचा मृत्यू

googlenewsNext

उत्तराखंडसह अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनामुळे मध्य प्रदेशातील तीन गंगोत्री यात्रेकरूंसह आठ जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. पावसामुळे झालेले अपघात, भूस्खलन आणि पुरामुळे मंगळवारी आणखी 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यासह, 8 जुलैपासून या भागातील मृतांची संख्या 91 वर गेली आहे.

डोंगराळ भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यातील चंद्रताल येथे मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीमुळे 300 पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या आपत्तीत गेल्या तीन दिवसांत राज्यात 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर मंडी, कांगडा आणि लाहौल स्पितीमध्ये चार जण बेपत्ता आहेत. त्याचवेळी, उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मंगळवारी भूस्खलनामुळे पाच पर्यटकांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. पंजाब आणि हरियाणामध्येही पूरस्थिती आहे, त्यामुळे पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.

विविध भागात सुमारे 600 पर्यटक अडकले

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14,100 फूट उंचीवर असलेल्या चंद्रताल येथील कॅम्पमध्ये 300 हून अधिक पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे ते परत येऊ शकत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरने वाचवण्याचे आवाहन प्रशासनाने हवाई दलाला केले आहे. खराब हवामान हे शक्य झालं नाही. याच दरम्यान, लोकांना वाचवण्यासाठी काजा येथून बचाव पथक रवाना झाले असून, पाऊस थांबल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागात सुमारे 600 पर्यटक अडकले आहेत. सोमवारपासून राज्याच्या विविध भागात अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे.

घरं पाण्याखाली गेली असून पिकांचं नुकसान

हरियाणा आणि पंजाबमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. दोन्ही राज्यांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुपनगर, पटियाला, मोहाली, अंबाला आणि पंचकुला यासह बाधित जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. पंजाबमधील सर्वाधिक प्रभावित रुपनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पंजाबमधील शाहकोटजवळ सतलुज नदीच्या पुराच्या पाण्यात 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. होशियारपूरमध्ये छत कोसळल्याने एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: heavy rains wreak havoc in himachal uttarakhand condition of up-punjab is also bad 91 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.