पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचे, हीराबेन यांचे आज १०० व्या वर्षी निधन झाले. मोदींना आईच्या निधनाचे वृत्त समजताच ते पहाटेच अहमदाबादला रवाना झाले. आईच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नीही दिला. यानंतर मोदींनी कुटुंबासमवेत काही वेळ घालवत लगेचच दैनंदिन कामांना सुरुवात केली.
हीराबेन यांची बुधवारी प्रकृती खालावली होती. यावेळी मोदी आईला पाहण्यासाठी अहमदाबादला आले होते. गुरुवारी प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यामुळे मोदी पुन्हा दिल्लीला परतले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. मोदी यांनी गांधीनगरमध्ये हीराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यानंतर स्मशानभूमीत मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले. हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. हीराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.
हीराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मोदी पुन्हा देशसेवेत रुजू झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीशिवाय मोठे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. मोदी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.