शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

हल आणि हातामुळे मोदी सरकार झुकले

By admin | Published: September 21, 2015 1:50 AM

‘जब हल और हाथ की ताकत साथ आयी तो मोदी सरकार को भूमी अध्यादेश वापस लेकर इस ताकत के आगे झुकना पडा। यह किसी व्यक्ती की नही आप की जीत है।

नवी दिल्ली : ‘जब हल और हाथ की ताकत साथ आयी तो मोदी सरकार को भूमी अध्यादेश वापस लेकर इस ताकत के आगे झुकना पडा। यह किसी व्यक्ती की नही आप की जीत है। देशका किसान केवल अन्नदाता ही नही भाग्यविधाता भी है।’ सोनिया गांधींच्या मुखातून हे उद्गार ऐकताच दिल्लीच्या रामलीला मैदानावर जणू चैतन्याची लहर उसळली. श्रोत्यांना मधेच थांबवीत सोनिया म्हणाल्या, ही लढाई अजून संपलेली नाही, आता ती राज्या-राज्यांत पोहोचली आहे. काँग्रेस दिल्लीत कायदा मंजूर होऊ देणार नाही, याचा अंदाज आल्यावर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना हा कायदा करण्यासाठी त्यांनी भरीस घातले आहे.नवी दिल्ली : ‘जब हल और हाथ की ताकत साथ आयी तो मोदी सरकार को भूमी अध्यादेश वापस लेकर इस ताकत के आगे झुकना पडा। यह किसी व्यक्ती की नहीं आप की जीत हंै। देशका किसान केवल अन्नदाता ही नहीं, भाग्यविधाता भी हैं।’ सोनिया गांधींच्या मुखातून हे उद्गार ऐकताच दिल्लीच्या रामलीला मैदानावर जणू चैतन्याची लहर उसळली. श्रोत्यांना मधेच थांबवीत सोनिया म्हणाल्या, की ही लढाई अजून संपलेली नाही़ आता ती राज्याराज्यात पोहोचली आहे. काँग्रेस दिल्लीत कायदा मंजूर होऊ देणार नाही, याचा अंदाज आल्यावर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना हा कायदा करण्यासाठी त्यांनी भरीस घातले आहे.भूसंपादन विधेयकाच्या विरोधात दिल्लीत लढाई जिंकल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी रामलीला मैदानावर ‘विजय रॅली’चे आयोजन करण्यात आले होते, सोनिया त्या रॅलीला संबोधित होत्या. १९ एप्रिल रोजी याच मैदानावर काँग्रेसने भूसंपादन विधेयकाच्या विरोधात महारॅलीचे आयोजन केले होते. त्याचा उत्तरार्ध आजच्या विजयोत्सव रॅलीने संपन्न झाला. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वादग्रस्त भूसंपादनाच्या मुद्द्यावर संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस विकासाच्या मार्गात खोडा आणत आहे, हा पंतप्रधानांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. सोनिया म्हणाल्या, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभर शेतकरी दुरवस्थेत आहे. पावसाने काही भागांत यंदा ओढ दिली तर कुठे अतिवृष्टी झाली. कुठे दुष्काळ तर कुठे महापूर अशा संकटाच्या वेळी पंतप्रधानांकडे परदेश वाऱ्यांसाठी आणि उद्योगपतींना भेटण्यासाठी वेळ आहे; मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. देशातल्या तरुणांना हेच मोदी मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवून देणार होते. त्याचे काय झाले? आता त्या विषयावर ते बोलतही नाहीत आणि कोणाचे ऐकतही नाहीत. आमच्यावर आरोप केला जातो की संसदेच्या कामकाजात आम्ही अडथळे निर्माण करतो. होय, जनतेचा आवाज जर हे सरकार ऐकणारच नसेल तर यापुढेही हाच प्रयोग आम्ही वारंवार करू. एक गोष्ट लक्षात घ्या, विकासाच्या विरोधात काँग्रेस पक्ष कधीच नव्हता. स्वातंत्र्यलढ्यात ज्या पक्षाने अनेक बलिदाने दिली, आधुनिक भारताची ज्याने निर्मिती केली तो पक्ष विकासाच्या विरोधात कसा असेल? राष्ट्रहितासाठी आम्ही वाटेल तो त्याग करायला तयार आहोत. केवळ आपले वैफल्य लपविण्यासाठी पंतप्रधान आमच्यावर असले आरोप करीत आहेत. वादग्रस्त भूसंपादन विधेयकाविरुद्धची पहिली लढाई जिंकल्यानंतर काँग्रेसने रविवारी मोदी सरकारविरोधात दुसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकत भूसंपादनाविरोधातील लढा राज्याराज्यांत नेण्याची घोषणा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ची खिल्ली उडवीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ‘मेक’चा अर्थ निर्माण करणे आणि ‘टेक’चा अर्थ काढून घेणे. ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करणाऱ्या सरकारचा प्रत्यक्षात ‘टेक इन इंडिया’वर अधिक भरोसा आहे. या योजनेसाठीच तुमची जमीन ते काढून घेणार होते. काँग्रेसच्या ४४ खासदारांनी संसदेत तीव्र लढा देत त्यांचा हा डाव रोखला. मोदींच्या दरबारात शेतकऱ्यांना स्थान नाही. आपली व्यथा माझ्याकडे बोलून दाखवताना एक शेतकरी म्हणाला, शेतकऱ्याला दोन माता असतात, पहिली जी माझी घरात काळजी घेते आणि दुसरी आई म्हणजे आमची जमीन. जिथे काबाडकष्ट करून देशासाठी आम्ही धान्य पिकवतो. मोदी सरकार आमच्या आईलाच आमच्यापासून हिरावून घ्यायला निघाले आहे.शेतकरी कमजोर झाला तर मोदींना ते हवेच आहे. काही राज्यांत ऊ स उत्पादक आता संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. रोज नवी परिधाने नेसणाऱ्या मोदींना शेतकऱ्यांच्या या व्यथा कशा कळणार? नवनव्या पेहरावात कधी १५ लाखांचा सूटही त्यांच्या अंगावर असतो. अशा सूट-बूटवाल्यांचा दरबारच अवतीभवती त्यांनी भरवला आहे. त्यांचेच ते ऐकतात. सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी संघर्षच करावा लागणार आहे. काँग्रेसच्या किसान सन्मान रॅलीत दिल्ली व आसपासच्या राज्यांतले लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हरयाणातले लोक त्यात उठून दिसत होते. शक्तिप्रदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री हुड्डा व अशोक तंवर या दोन नेत्यांचे समर्थक गुलाबी व लाल रंगाचे फेटे चढवून आले होते. रॅली सुरू होण्यापूर्वी या दोन गटांतल्या काही समर्थकांमधे बाचाबाची झाली. व्यासपीठावरून सूचना देऊन अखेर हा व्यत्यय थांबवावा लागला.