श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे सैन्य दलाचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. त्यामध्ये, दोन जवान जखमी झाले असून स्थानिकांनी मदतीसाठी धावपळ केल्याचे दिसून आले. दरवेळी संकटातील माणसांना वाचविण्यासाठी सैन्य दल आपल्या जीवाची बाजी लावून धावपळ करत असते. आता, पत्नीटॉपच्या शीवगढ धार येथे संकटात सापडलेल्या सैन्यातील जवानांसाठी स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावल्याचं पाहायला मिळालं.
सैन्य दलाचे हेलिकॉप्टरला येथील परिसरात अपघात झाला होता. त्यावेळी, हेलिकॉप्टरचे इंजिन सुरू असताना स्थानिकांनी धाव घेत पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढले. त्यानंतर, बाजेवर टाकून तब्बल तीन किमीचा रस्ता डोंगरवाटांतून, पावसाच्या पाण्यातून पार केला. लोकांनी जवानांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, दुर्दैवाने पायलटचे निधन झाले.
पत्नीटापच्या शिवगढ धार परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. याचदरम्यान, सैन्यदलाचे हेलिकॉप्टर येथून जात होते, पण पावसामुळे ते माघारी फिरले. त्यामुळे, ते जंगलात गिरक्या घेऊन लागले. या, दरम्यान, मोठा आवाज झाला. घनदाट जंगलात हेलिकॉप्टर दिसून येत नव्हते, पण त्याच्या इंजिनचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून सर्वप्रथम दोन महिला दर्शनादेवी आणि शक्तीदेवी घटनास्थळी पोहोचल्या. या दोन्ही महिलांचे घर घटनास्थळावरून 400 किमी अंतरावर होते. त्यामुळे, या महिलांना इतरांना आवाज देत बोलावून घेतले. त्यानंतर, परिसरातील लोक मदतीला धावून आले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्थानिकांना परिस्थितीचा आढाव घेतला, त्यावेळी इंजिनचा स्फोट होण्याचा धोका होता. तरीही, स्थानिकांनी मदत व बचावकार्यासाठी आगेकूच केली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, त्यांना करलाहपर्यंत गावकऱ्यांनीच पोहोचले. तोपर्यंत पोलीस आणि सैन्यातील काही अधिकारीही पोहोचले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ऊधमपूर येथील सैन्याच्या हॉस्पीटलमध्ये त्यांना पाठविण्यात आले. मात्र, एवढे प्रयत्न करूनही जवानांचा जीव वाचविण्यात अपयश आलं. दोन्ही जवानांच्या वीरमरणाच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली.