चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, काही ठिकाणी सोन्याच्या दुकानात चोरी होते. तर काही ठिकाणी बँकांमध्ये चोरी झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत, आता उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अजब चोरीची घटना समोर आली आहे. हवाई पट्टीवर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरचे काही भाग वेगळे केले आहेत. १०-१५ जण हवाई पट्टीत घुसले आणि त्यांनी हेलिकॉप्टरचे भाग तोडून टाकले. यावेळी पायलटने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, यावेळी पायलटलाही मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काँग्रेसचे सरकार आल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्टच सांगितलं...
हेलिकॉप्टर पायलट कॅप्टन रवींद्र सिंह यांनी आत याबाबत एसएसपींनाही अर्ज दिला आहे. परतापूर हवाई पट्टीवरून हेलिकॉप्टर व्हीटी-टीबीबीचे भाग काढून घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. '३ वाजण्याच्या सुमारास एका टेक्निशियनने मला फोनवर सांगितले की काही लोक हेलिकॉप्टरचे पार्ट काढत आहेत,असं पायलटने सांगितलं.
'मी हेलिकॉप्टरचा पायलट असल्याने ती माझी जबाबदारी आहे, त्यामुळे मी ताबडतोब हेलिपॅडवर पोहोचलो आणि पाहिले तर १५-२० लोक हेलिकॉप्टरचे भाग खोलत आहेत. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. मी तात्काळ परतापूर पोलीस ठाण्याला फोनवरून कळवले व पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, अशी माहिती पायलटने दिली.
पायलटने पुढे सांगितले की, मी या हेलिकॉप्टरचा पायलट आहे आणि या कंपनीचा सीईओ आणि संचालक आहे. याबाबत मी ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी डीजीसीएला पत्रही दिले आहे. त्याची प्रत जोडली आहे. या प्रकरणाची दखल घेत एसएसपींनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सीओ ब्रह्मपुरी यांच्याकडे सोपवला असून लवकरच अहवाल मागवला आहे. याप्रकरणी मेरठच्या एसएसपी सांगितले की, हेलिकॉप्टर लुटल्याची कोणतीही घटना नाही. ही घटना सुमारे तीन महिने जुनी असून, दोन साथीदारांमध्ये वाद सुरू आहे.