हॅलो २ - निसर्गाशी संवाद साधा : तांडेल
By admin | Published: May 05, 2015 1:21 AM
निसर्गाशी संवाद साधा : तांडेल
निसर्गाशी संवाद साधा : तांडेलबार्देस : आजच्या आधुनिक यंत्र युगातही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व निरोगी राहण्यासाठी निसर्गाशी संवाद साधण्याबरोबरच योग्य दिनचर्या राखणे आवश्यक आहे, असे पतंजली योग समितीचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष सुशांत तांडेल म्हणाले.ज्ञानदीप प्रतिष्ठान संचालित आंगोड-म्हापसा येथील ज्ञानदीप निसर्गोपचार व योग केंद्रातर्फे आयोजित शारीरिक व मानसिक आजारांवर योग चिकित्सेद्वारे मार्गदर्शन व उपचार सेवा विभागाच्या उद्घाटनप्रसंगी तांडेल बोलत होते. या वेळी व्यासपीठावर यशोदामिनी पुरस्कार विजेत्या ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या सचिव राखी पालेकर, प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी लाडू गावकर, शशिकांत बांदेकर उपस्थित होते. तांडेल म्हणाले, नैसर्गिक योग्य दिनचर्येमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व समस्त रोगांपासून शरीराचे रक्षण होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शशिकांत बांदेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) फोटो : म्हापसा येथे शिबिराचे उद्घाटन करताना शशिकांत बांदेकर. बाजूस सुशांत तांडेल व लाडू गावकर. (प्रकाश धुमाळ) २२०३-एमएपी-१२