हॅलो ३- आशेवाडा येथे गणेश विसर्जन तळीचे उद्घाटन
By admin | Published: July 08, 2015 11:45 PM
शिरोडा : आशेवाडा-बेतोडा येथे सुमारे ५ लक्ष खर्चून येथे बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जनासाठी तळी व पायर्यांचे उद्घाटन उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेतोड्याच्या सरपंच पूनम सामंत, पंचसदस्य ज्योती गावडे, चंद्रकांत सामंत, दुर्गाप्रसाद वैद्य व राजेंद्र नाईक, आनंद गावकर, वामन गावडे, परेश गावडे, लक्ष्मण गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिरोडा : आशेवाडा-बेतोडा येथे सुमारे ५ लक्ष खर्चून येथे बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जनासाठी तळी व पायर्यांचे उद्घाटन उद्योगमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बेतोड्याच्या सरपंच पूनम सामंत, पंचसदस्य ज्योती गावडे, चंद्रकांत सामंत, दुर्गाप्रसाद वैद्य व राजेंद्र नाईक, आनंद गावकर, वामन गावडे, परेश गावडे, लक्ष्मण गावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.उद्योगमंत्री नाईक म्हणाले की, प्रत्येक लोकप्रतिनिधीने कर्तव्य योग्यरीतीने बजावल्यास गावातील कुठल्याही समस्या अधांतरी राहाणार नाही. या भागातील प्रतिनिधी विकासाच्या बाबतीत सतर्क आहेत. तसेच स्थानिक समस्यांना प्राधान्य देण्यात येईल. पूनम सामंत यांनीही आपले मत व्यक्त केले. ज्योती गावडे यांनी स्वागत केले. दुर्गादास वैद्य यांनी आभारप्रदर्शन केले.फोटो स्कॅनरसाठी..ओळी : आशे-बेतोडा येथे गणपती विसर्जनाच्या पायर्या व तळीचे उद्घाटन करताना उद्योगमंत्री महादेव नाईक. सोबत पूनम सामंत व ज्योती गावडे.