तळेगाव रोही : वाहेगाव साळ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयास नाशिक रन, नाशिक चॅरिटेबल ट्रस्टच्या (धर्मादाय विश्वस्त मंडळ) वतीने आर. ए. कासार व व्ही.डी. पुरोहित या विश्वस्तांनी भेट दिली. त्यांचे लेजीम पथकांने स्वागत केले. हर्षद कासव व हरीश लुकारे या सहावीच्या विद्यार्थ्यांनी मेणबत्ती, व्हॉईट पेट्रोलियम जेली, नीलगिरीतील अस्मानतारा इत्यादि वस्तूंचा वापर करून आयुर्वेदिक व्हिक्स बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी एन. एस. मंडलिक होते. एस. एम. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कासार व पुरोहित यांचा सत्कार करण्यात आला. विश्वस्तांनी यापूर्वी साडेसतरा लाख रुपये शाळा बांधकामासाठी मदत केली, तर चांगले काम केल्याने पुन्हा अडीच लाख रुपयांचा धनादेश विद्यालयास मदत म्हणून दिला. व्ही. जे. खैरनार यांना शुभेच्छा दिल्या. ( वार्ताहर)
ज्ञानेश्वर विद्यालयास मदत
By admin | Published: January 03, 2016 11:17 PM