सेवाभावी संस्थेच्या मदतीने गरजूंना अल्प दरात औषधी
By admin | Published: October 30, 2015 11:57 PM
जळगाव : मनपाच्या छत्रपती शाहू रुग्णालयाजवळील व्यापारी संकुलात गरजू रुग्णांना अल्प दरात जेनेरीक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही सेवाभावी संस्थांशी बोलणे सुरू असल्याची माहिती स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिली.
जळगाव : मनपाच्या छत्रपती शाहू रुग्णालयाजवळील व्यापारी संकुलात गरजू रुग्णांना अल्प दरात जेनेरीक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील काही सेवाभावी संस्थांशी बोलणे सुरू असल्याची माहिती स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिली. शाहू रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपाला ८८ लाख रुपयांचा निधी काही दिवसांपूर्वींच मंजूर झाला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यापार्श्वभूमीवर सभापती बरडे यांनी गुरुवारी शाहू रुग्णालयात भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. शाहू रुग्णालयातच होणार प्रसूती दरम्यान, शहरात मनपाचे तीन प्रसूतीचे दवाखाने आहेत. त्यात छत्रपती शाहू रुग्णालयात गरोदर महिलांसाठी २० खाटा आहेत. तसेच इतर सुविधाही याठिकाणी असल्यामुळे यापुढे याच रुग्णालयात प्रसूती करण्याचा विचार आहे. त्यासाठी हा दवाखाना लवकरच सुसज्ज केला जाणार आहे. त्याठिकाणी फर्निचर, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य मागविण्यात येणार आहे. तसेच हॉस्पिटलची दुरुस्तीही केली जाणार आहे. ८८ लाखाच्या प्राप्त निधीतून हे काम केले जाणार आहे.