नवी दिल्ली- इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांचे मृतदेह घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह भारतात परतले आहेत. विशेष विमानातून सर्व मृतदेह अमृतसरला दाखल झाले असून, त्यानंतर ते कोलकात्याकडे रवानाही करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर व्ही. के. सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.पत्रकार परिषदेत इराकमधल्या इसिसच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 38 भारतीयांच्या कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात व्ही. के सिंह यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी मृत कुटुंबीयांच्या मदतीसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही. हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता तरी तुम्हाला समजलं का ?, मी तर मदतीची घोषणा कशी करू, माझ्या खिशात पेटारा थोडी आहे, असं व्ही. के. सिंह म्हणाले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणं म्हणजे बिस्किट वाटण्याचं काम नाही- व्ही. के. सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 5:03 PM