शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

मदत करणे बेतले जीवावर

By admin | Published: November 22, 2015 11:16 PM

दोघांना कोठडी : पैशांचा तगादा मिटविण्यासाठी केला वृध्देचा गेम

दोघांना कोठडी : पैशांचा तगादा मिटविण्यासाठी केला वृध्देचा गेम
जळगाव: अडचणीत असलेल्याला मदतीचा हात दिला अन् त्यानेच जीव घेतल्याचे धक्कादायक वास्तव खाजोळा (ता.पाचोरा) येथील सायंकाबाई जगन मोरे (वय ५०) या वृध्द महिलेच्या खून प्रकरणात उघड झाले आहे. गाय विक्री करुन भावडूला सायंकाबाईने पाच हजार रुपये उसने दिले होते. दरम्यान, न्या.एम.व्ही.मोहळ यांनी आबा उर्फ शालिग्राम लालचंद पवार (वय ३२) व भावडू शिवाजी भील (वय २८) दोन्ही रा.खाजोळा या दाघं आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खाजोळा शिवारात १८ नोव्हेंबर रोजी सायंकाबाईचा मृतदेह बापु पाटील यांच्या शेतात आढळून आला होता. सायंकाबाईकडून भावडूने पाच हजार रुपये घेतले होते. त्यासाठी सायंकाबाईने त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला होता. काम धंदा करीत नसल्याने पैसे देण्यास अडचणी होत्या तर आबा हा देखील बेरोजगार होता. त्यालाही पैशाची गरज होती. दोघंही मित्र असल्याने त्यांनी सायंकाबाईचा कुर्‍हाडीने गेम करण्याचे ठरविले. मात्र त्यामुळे अपण अडचणीत येवू शकतो अशी जाणीव झाल्याने त्यांनी तो प्लॅन रद्द केला. दोरीने गळा आवळून खून केला. या खुनानंतर दोघंही जणू आपल्याला काही माहितच नाही या आवेषात गावकर्‍यांसोबत फिरले.
पोलीस निरीक्षक दादाराव सिनगारे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संदीप पाटील, बोरसे, गणेश मराठे, सचिन विसपुते, हिरा पाटील, गजू काळे, बापुराव भोसले, रवींद्र गिरासे, राजेंद्र पाटील, शरद भालेराव, विलास पाटील, रामकृष्ण पाटील, ईश्वर सोनवणे व दीपक पाटील आदींच्या पथकाने या खुनाचा उलगडा केला.