प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य; भाजपा नेत्यांवर भडकल्या हेमा मालिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 09:53 AM2019-01-31T09:53:26+5:302019-01-31T09:56:43+5:30
'सेक्सिस्ट कॉमेंट्स करण्याऱ्या लोकांना राजकारणात कोणतेच स्थान नाही'
मथुरा : काँग्रेसतर्फेप्रियंका गांधी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात आल्यापासून सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) काही नेत्यांनी प्रियंका गांधी आणि काँग्रेसवर वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
जास्तकरुन प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावरुन भाजपाच्या नेत्यांनी टिप्पणी केली आहे. दरम्यान, अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी यांनी अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पार्टीच्या नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. तसेच, त्यांनी अशी विधाने किंवा सेक्सिस्ट कॉमेंट्स करण्याऱ्या लोकांना राजकारणात कोणतेच स्थान नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान, भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. कैलास विजयवर्गीय म्हणाले की, 'काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे काँग्रेसकडून आता चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याची अफवा पसरवली जाते, तर कधी करीना कपूर निवडणुक लढणार असल्याच्या चर्चा रंगतात. तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते.' असे विवादित वक्तव्य केले होते.
BJP's Kailash Vijayvargiya: Unke paas leader nahi hain, isliye wo chocolatey chehre ke madhyam se chunav mein jaana chahte hain. Ye unke andar atmavishwas ke kami ko dikhata hai... Koi Kareena Kapoor ka naam chalata hai, koi Salman Khan ka, kabhi Priyanka Gandhi ko le aate hain. pic.twitter.com/GhVWrnuRbR
— ANI (@ANI) January 26, 2019