भुवनेश्वर - एखाद्या मानवाला डोक्याला जखम असल्यास सिटी स्कॅन केलंल तूम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. पण तूम्ही कधी एखाद्या प्रण्याचं सिटी स्कॅन केलंल पाहिलं अथवा ऐकलं आहे का? पण भारतामध्ये एका अजगराचं स्टिटी स्कॅन करण्यात आलं आहे. ओडिसामध्ये रविवारी एका आठ फूट लांब जखमी अजगराचं उपचारादरम्यान सिटी स्कॅन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजगराच्या डोक्याला जखम झाली होती. ती जखम कशी झाली आणि त्याच्यावर काय उपचार करता येतील. हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी आठ फूट लांबीच्या अजगराचे सिटी स्कॅन केलं.
ओडिसातील आनंदपूरच्या जंगलामध्ये वनआधिकारी मिहिर पटनायक यांनी अठ फूट अजगराला गंभीररित्या जखमी अवस्थेत पाहिलं. त्यानंतर त्यांनी त्याला वॅटेरनरी कॉलेजमध्ये उपचारासाठी आणले. आणि त्यावर उपचार करण्यात आले. खासगी रुग्णालयात अजगराचं सिटी स्कॅन करण्यात आले. भारतात प्राण्याचं सिटी स्कॅन करण्याची ही पहिलीच घटना असेल असे स्नेक हेल्पलाइनचे मालक शुभेंदु यांनी सांगितलं.