नेपाळमध्ये बुधवारी पहाटे ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की दिल्ली, गाझियाबाद, गुरुग्राम आणि लखनौसह उत्तर भारतातील काही भागांतही ते जाणवले. नेपाळमधील डोटी जिल्ह्यात घर कोसळून किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढपासून ९० किमी आग्नेयेला भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी मंगळवारी संध्याकाळी या भागात ४.९ आणि ३.५ रिश्टर स्केलचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते.
नेपाळ हे हिमालयाच्या कवेत वसलेले आहे. येथे हल्ली अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. एप्रिल २०१५ च्या विनाशकारी भूकंपाने नेपाळ हादरला होता. सरकारी आकडेवारी दर्शवते की त्या भूकंपात ८,९६४ लोकांचा मृत्यू झाला आणि २१,९५२ लोक जखमी झाले. हिमालयीन प्रदेशात असा विनाशकारी भूकंप होण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
अंदाज वर्तवणे कठीणहिमालयीन प्रदेशात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता असूनही त्याचा अंदाज वर्तवता येणार नाही आणि हे पाहता घाबरून जाण्याऐवजी शास्त्रज्ञांनी त्याला तोंड देण्यासाठी जोरदार तयारी करण्यावर भर दिला आहे. ‘इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील घर्षणामुळे हिमालय अस्तित्वात आला आहे. युरेशियन प्लेटच्या इंडियन प्लेटवरील सातत्याने वाढणाऱ्या दबावामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहगे. त्यातंच परिवर्तन भूकंपात होत असल्याची माहिती, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे वरिष्ठ भूभौतिकशास्त्रज्ञ अजय पॉल यांनी पीटीआयला सांगितले.
काय असेल रिश्टर स्केलवर तीव्रता?अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे भूकंप येणं ही सामान्य आणि सातत्यानं होणारी प्रक्रिया ठरेल. पूर्वेकडील हिमालय क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे आणि या ठिकाणी मोठा भूकंप होण्याची मोठी शक्यता कायमच बनली आहे. हा भूकंप रिश्टर स्केलवर सात किंवा त्यापेक्षा अधिक असण्याचीही शक्यता असल्याचे पॉल म्हणाले.
कधी येईल खात्री नाहीभूकंप कधी येईल याचा कोणताही अंदाज बांधता येणार नाही. तो कसा असेल हेदेखील कोणाला माहित नाही. पुढील क्षणालाही भूकंप होऊ शकतो, एका महिन्याने किंवा एका वर्षानेही तो होऊ शकतो किंवा शंभर वर्षानेही. गेल्या दीडशे वर्षांमध्ये या क्षेत्रात चार मोठ्या भूकंपांची नोंद करण्यात आली. १८९७ मध्ये शिलॉंग, १९०५ मध्ये कांगडा, १९३४ मध्ये बिहार-नेपाळ आणि १९५० मध्ये आसामच्या भूकंपाचा समावेश आहे. या सर्व माहितींवरूनही भूकंप कसा असेल याबाबत सांगता येत नाही. १९९१, १९९ आणि २०१५ मध्येही भूकंप आले. याला घाबरण्याऐवजी त्याचा सामना करण्यासाठी योग्य तयारी करावी लागणार आहे. जेणेकरून त्याचं नुकसान कमी होईल, असंही पॉल यांनी स्पष्ट केले.
आतापासून तयारी करा“यासाठी बांधकामांना भूकंपरोधी करण्यात यावं, भूकंप येण्यापूर्वी आणि येण्याच्या वेळी आणि त्यानंतर करण्यात येणाऱ्या तयारीबाबत लोकांना जागरुक केले जावे. कमीतकमी एका वर्षात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात यावे. जर या गोष्टींकडे लक्ष दिले तर यातून होणारे नुकसान ९९.९९ टक्के कमी करता .येऊ शकते,” असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी जपानचे उदाहरणही दिले.