ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 31 - राम मंदिर प्रकरणी दररोज सुनावणी घ्यावी ही सुब्रहमण्यम स्वामी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच तातडीने सुनावणी घेण्यास न्यालयाने नकार दिला आहे. राम मंदिर प्रकरणाच्या खटल्याचे तुम्ही याचिका कर्ते नसताना तुम्हाला याप्रकरणात एवढा रस का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांना विचारला. च्याप्रमाणे दररोज या प्रकरणावर सुनावणी करण्यास आमच्याकडे वेळ नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना फटकारले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर स्वामींनी नाराजी व्यक्ती केली.अयोध्या मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्याचे सांगत, हा वाद सोडविण्यासाठी सर्व संबंधित पक्षांनी न्यायालयाबाहेर नव्याने प्रयत्न करावेत, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने 21 मार्च रोजी दिला होता. यासाठी एकत्र बसून चर्चा करा, प्रसंगी मध्यस्थाची नियुक्ती करा आणि त्यासाठी वाटल्यास आम्ही मदत करू, असेही न्यायालयाने सांगितले. तरही मागील सहा ते सात वर्षे या प्रकरणात काहीच हालचाल झाली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा लवकर निकाल लागावा यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Supreme Court refuses to give early hearing to Ram temple case, mentioned by BJP leader Subramanian Swamy pic.twitter.com/FTFLwk3eXj— ANI (@ANI_news) March 31, 2017