शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Hibaj Contraversy: हर्षाच्या हत्येप्रकरणी 3 अटकेत, अंत्ययात्रेत गोंधळ, कडक बंदोबस्त तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 11:28 AM

कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे

बंगळुरू - कर्नाटकातील शिवमोगा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणात हिजाब वादाशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मात्र, या घटनेचे देशभर पडसाद उमटताना दिसून येत आहेत. ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, सोमवारी मृत हर्षाच्या अंत्यसंस्कारावेळी गोंधळ निर्माण झाला होता.

कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री 9 वाजता ही हत्येची घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. शिवमोगा येथे हत्या करण्यात आलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव हर्षा असून तो बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचं उघडकीस आलं आहे. हर्षाने आपल्या फेसबुकवर हिजाबविरुद्ध पोस्टी केली होती, त्याने भगवा शालीचं समर्थन केलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्याप्रकरणानंतर शिवमोगा येथे तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

सोमवारी सायंकळी हर्षाची अंत्ययात्रा निघाल्यानंतर काही वेळातच गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेत दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. त्यामध्ये, एक पत्रकार आणि पोलीस महिला कर्मचाऱ्यांसह 3 जण जखमी झाले आहेत. काही वाहनांना आगीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आले. याप्रकरणी गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्तापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून हत्येमागचे कारण अद्याप समोर आलं नसल्याचंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून भाजप नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. 

शिवमोगा येथे कडक पोलीस बंदोबस्त

शिवमोगा येथे बंदोबस्तासाठी 1200 सुरक्षारक्षक तैनात आहेत, रॅपिड अॅक्शन फोर्सही आहे, 200 सुरक्षा रक्षकांना बंगळुरू येथून पाठविण्यात येत असून आणखी 200 जणांना दुसऱ्या जिल्ह्यात ड्युटीवर तैनात असलेल्यांच्या जागी पाठविण्यात येत आहे, असेही गृहमंत्री ज्ञानेंद्र अरागा यांनी सांगितले.   

रविना टंडननेही केली न्यायाची मागणी 

अभिनेत्री रविना टंडन आणि चित्रपट दिग्दर्शक मनीष मुंद्रा यांनी या घटनेबद्दल ट्विट करुन न्यायाची मागणी केली आहे. ट्विटरवर हॅशटॅग 'जस्टीस फॉर हर्षा' हा ट्रेंड होत असून मुंद्रा यांनी ही मॉब लिचिंग असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त न्यूटन आणि मसान या चित्रपटांसाठी मुंद्रां यांची ओळख आहे. तर, रविनाने कवेळ #JusticeForHarsha असे टाईप करत न्यायाची मागणी केली आहे.  

गृहमंत्र्यांनी घेतली भेट, शाळा-कॉलेज बंद

घटनेनंतर वाढता तणाव पाहता कल 144 लागू करण्यात आले आहे. तसेच, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी पीडित कुटुंबीयांशी भेटून संवाद साधला. ज्ञानेंद्र यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, हत्या करण्यात आलेल्या युवकांस 4 ते 5 जणांनी ठार मारल्याचा संशय आहे. पोलिसांचा तपास सुरू असून संबंधित आरोपी हे कुठल्या संघटनेशी संलग्नित आहेत का, याचाही तपास घेण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवमोगा जिल्ह्यात दोन दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं. 

दरम्यान, कर्नाटकातील हिजाब वादावर बंजरंग दल सर्वाधिक सक्रीय आहे. अनेक हिंदू संघटनाही शाळा-महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास विरोध करत आहेत. हिजाब विरोधी प्रदर्शन करताना भगवी शाल गळ्यात घालून ते विरोध दर्शवताना दिसून येतात.

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस