शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

खाद्य व्यावसायिकांना हायकोर्टाचा दिलासा

By admin | Published: February 18, 2015 11:53 PM

नागपूर : एकाच परिसरात एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने चालविणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहेत.

नागपूर : एकाच परिसरात एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने चालविणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती करू नये, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहेत.
एकापेक्षा अधिक प्रतिष्ठाने संचालित करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना प्रत्येक प्रतिष्ठानासाठी स्वतंत्र परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याविरुद्ध नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर इतवारी किराणा व्यापारी संघटना व इतरांनी रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावणीची संधी दिल्यानंतर या प्रकरणावर कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याचे शासनाला निर्देश देऊन याचिका निकाली काढली आहे. वरील अंतरिम आदेश शासनाचा निर्णय होतपर्यंतच लागू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित एका प्रकरणात अशाप्रकारची सक्ती अवैध ठरविल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले. सरकारी वकिलाने शासन याप्रकरणी योग्य निर्णय घेईल, अशी ग्वाही न्यायालयाला दिली.