शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

काश्मिरात घरोघरी लपलेले दहशतवादी आता लष्कराच्या "रडार"वर

By admin | Published: June 11, 2017 10:58 AM

लष्कर काश्मीरमधल्या घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी नवी रणनीती आखत आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 11 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. घराघरात लपून बसलेले दहशतवादी अचानकपणे जवानांवर हल्ले करत होते. मात्र लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी जवानांनी नवी शक्कल लढवली आहे. भारतीय लष्कर काश्मीरमधल्या घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी नवी रणनीती आखत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लष्कर सर्च ऑपरेशनदरम्यान जिहादी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी नव्या रडार सिस्टीमचा वापर करणार असून, हे रडार घर आणि भिंतीच्या आरपार प्रवेश करण्यात सक्षम आहे. एका लष्करी अधिका-यानं सांगितलं की, या रडार सिस्टीमला अमेरिका आणि इज्रायलकडून मागवण्यात आलं आहे. हे रडार सिस्टीम जवानांना दहशतवाद्यांचं लोकेशन ट्रेस करण्यासाठी मदत करणार आहे. जे अंडरग्राऊंड राहून काम करतात. अधिका-यांच्या मते, काही जवान या रडार सिस्टीमचा वापर काश्मीरमध्ये करत आहेत. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या ज्वाइंट ऑपरेशनमध्ये मिळालेल्या अपयशामुळे या रडारची गरज भासली आहे. आता ज्वाइंट ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस आणि जवान लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढू शकणार आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, काही दहशतवादी काश्मीरमधील घरांमध्ये लपून दहशतवाद पसरवण्याचं काम करत आहेत. त्यानंतर लष्करानं हे ज्वाइंट ऑपरेशन राबवलं आहे.