जळगाव, भुसावळात हाय अलर्ट
By admin | Published: August 15, 2016 12:49 AM
जळगाव: स्वातंत्र दिन व इसीस संघटनेच्या नावाने जिल्हाधिकार्यांना मिळालेल्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर जळगाव व भुसावळ येथे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही रेल्वे स्थानकासह अन्य महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी स्वत: महत्वाच्या ठिकाणी भेटी देवून सुरक्षेचा आढावा घेतला.
जळगाव: स्वातंत्र दिन व इसीस संघटनेच्या नावाने जिल्हाधिकार्यांना मिळालेल्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर जळगाव व भुसावळ येथे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही रेल्वे स्थानकासह अन्य महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी स्वत: महत्वाच्या ठिकाणी भेटी देवून सुरक्षेचा आढावा घेतला.गेल्या आठवड्यात इसीस या दहशतवादी संघटनेच्या नावाने जिल्हाधिकार्यांना धमकी पत्र प्राप्त झाले होते. त्यात जळगाव व भुसावळ येथील रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्राच्या पार्श्वभूवीर दहशतवाद विरोधी पथक, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या पथकाकडून रेल्वे स्थानकांची वारंवार तपासणी केली जात आहे. श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. स्टेशनवर फिरणार्या प्रत्येक संशयास्पद व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्याची माहिती तातडीने वरिष्ठांना कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या. कर्मचार्यांच्या सुट्या रद्दस्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याने कर्मचार्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राखीव दल, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग व जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.शस्त्रास्त्रांसह पोलिसांचा पहारापोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी रविवारी जळगाव रेल्वे स्थानकावर भेट देवून पाहणी केली तसेच बंदोबस्त व सुरक्षेच्या संदर्भात अधिकार्यांना सूचना दिल्या. दोन्ही रेल्वे स्थानकावर शस्त्रास्त्रासह अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकुळ सोनोने, बॉम्ब शोधक पथकाचे प्रमुख ईश्वर सोनवणे, दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख गणेश इंगळे यांच्या पथकांनी कसून तपासणी केली. संशयास्पद व्यक्तीची तपासणी केली जात होती. नवीन बसस्थानक व सतरा मजली इमारतीतही श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.कोट.. स्वातंत्र्यदिन व निनावी पत्राच्या आधारे पोलीस दल सतर्क झाले आहे. शहर व जिल्ातील सर्व प्रमुख ठिकाणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी मात्र कोणत्याही अफवेला बळी पडू नये व घाबरुन जावू नये.संशयास्पद वस्तू व व्यक्तीबाबत तातडीने पोलिसांना कळवावे.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक कोट..रेल्वे स्थानकावर शस्त्रधारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जळगाव स्थानकावर थांबणार्या प्रत्येक एक्सप्रेस गाडीची तपासणी केली जात आहे. दोन दिवस हा बंदोबस्त कायम राहणार आहे.-गोकुळ सोनोने, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल