वॉशिंग्टन : उच्च रक्तदाब हेच भारतीयांना होणाऱ्या हृदयविकाराचे मुख्य कारण असून, या पाठोपाठ मधुमेह, तंबाखूचे सेवन व हाय कोलेस्टरॉल याही बाबी हृदयविकाराला कारणीभूत ठरत आहेत. ‘आऊटपेशन्ट केअर’वरील अभ्यासात ही बाब दिसून आली आहे.अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजीच्या पिनॅकल इंडिया कार्यक्रमात भारतीय नागरिकात वेगाने वाढणाऱ्या हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते भारतात हृदयविकाराची शक्यता वाढत आहे; पण हृदयविकार असणाऱ्यांची काळजी किती व कशी घेतली जाते याची मात्र फारशी माहिती नाही. हे संशोधन जर्नल आॅफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रसिद्ध झाले. (वृत्तसंस्था)४भारतात हृदयाची रक्तवाहिनी असणारी कारोनरी रोहिणीत अडसर निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी तंबाखूचा वापर, बैठे काम, जड जेवण ही कारणे आहेतच, तसेच अज्ञानामुळे काळजी न घेण्याची सवय आणि धोकादायक बाबींवर नियंत्रण न आणणे यामुळे धोका वाढत आहे.
उच्च रक्तदाब हेच हृदयविकाराचे कारण
By admin | Published: May 21, 2015 11:49 PM