बाबा रामदेव यांना दणका; पतंजलीच्या 'कोरोनील' औषधाबाबत उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:27 PM2024-07-29T16:27:54+5:302024-07-29T16:28:45+5:30
कोरोना आजारासाठी 'कोरोनील' औषध गुणकारी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता.
Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. त्यांच्या विरोधात अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी(दि.29) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आपल्या पतंजली उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी बाबा रामदेव यांनी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप डॉक्टर संघटनांनी याचिकेत केला आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने बाबा रामदेव आणि इतरांना समन्स बजावले होते.
पतंजलीचे 'कोरोनील' औषध कोरोना आजारावर गुणकारी असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर विविध डॉक्टरांच्या संघटनांच्या त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. डॉक्टरांच्या संघटनांनी योगगुरू बाबा रामदेव, त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेदविरोधात तक्रार दाखल केली होती.
आज अखेर या याचिकेवर निकाल देताना दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना आपला दावा मागे घेण्याचा सूचना दिल्या. यासाठी त्यांना तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. शिवाय, आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरुनही ही जाहिरात तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.