शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पाठलाग करून वाहन पकडण्यास पोलिसांना उच्च न्यायालयाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:24 AM

वाहनचालक व पोलिसांच्या जीवाला धोका असल्याचे मत; वाहन थांबविण्याचा सिग्नल मिळताच चालकाने थांबले पाहिजे

- डॉ. खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनासमोर अचानक येऊन, दुचाकीचे हॅण्डल पकडून किंवा पाठलाग करून वाहन थांबवण्यास पोलिसांना केरळ उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे वाहनचालक व पोलीस दोघांचाही जीव धोक्यात येतो, याबद्दल चिंता व्यक्त करीत न्यायालयाने हा निर्णय दिला.केरळ उच्च न्यायालयासमोर प्रकरण होते, एका दुचाकीचालकावर दाखल झालेल्या ३५३ भा.दं.वि.च्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनाचे १० ऑक्टोबर, २०१९ रोजी काही मोटारवाहन निरीक्षक महामार्गावर वाहन तपासणी करीत होते. त्यांना हेल्मेट न घालता मोटारसायकल चालवणारा एक इसम येताना दिसला. त्याच्यामागे एक १६ वर्षांचा मुलगाही बसला होता. मोटार वाहन निरीक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला थांबण्याचा इशारा केला; पण त्याने वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहन निरीक्षक जखमी झाला व दुचाकीचालकही एका कारला धडकून जखमी झाला. दुचाकीचालकाच्या म्हणण्याप्रमाणे वाहन निरीक्षक अचानक समोर आले व तो पळून जाईल, असे समजून मोटारसायकलचे हॅण्डल पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तोल जाऊन तो कारवर धडकला. यात मोटारसायकलवरील दोघे व निरीक्षकही जखमी झाले. या घटनेबद्दल दुचाकीचालकावर ३५३ व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.अटकपूर्व जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने ही घटना पोलीस व इतर अधिकारी वाहन थांबवण्यासाठी अचानक पकडण्याची जुनीच पद्धत अमलात आणत आहेत, हेच असल्याचे मत व्यक्त केले. कोणत्याही परिस्थितीत वाहतूक नियमभंगासाठी पोलीस किंवा इतर विभागाच्या लोकांनी अचानक समोर येऊन, पाठलाग करून पकडणे अपेक्षित नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. वाहन थांबवण्यासाठी कायद्यात असलेल्या तरतुदींचीही दखल घेतली. कायद्यात वाहन कसे थांबवावे याबद्दल असलेल्या तरतुदीत अचानक समोर येणे, हॅण्डल पकडणे, वाहनाची चावी काढून घेणे, पाठलाग करणे याचा समावेश नसल्याने या पद्धती बेकायदेशीर आहेत.वाहतूक नियमभंगासाठी डिजिटल कॅमेरा, मोबाईल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेऱ्याचा वापर केला पाहिजे.अशा प्रकारची तपासणी लोकांना पूर्वसूचना देऊन मोठी मोकळी जागा असणाऱ्या ठिकाणी केली पाहिजे.तपासणीचा उद्देश लोकांना अचानक पकडून कारवाई करण्याऐवजी त्यांना सुरक्षेचे शिक्षण मिळावे हाही असला पाहिजे.-न्या. राजा विजय राघवन व्ही., केरळ उच्च न्यायालयकाय आहे तरतूद?वाहन थांबवण्याबद्दलची मोटार व्हेईकल ड्रायव्हिंग रेग्युलेशन्स २०१७ मधील तरतूद :कोणतेही वाहन थांबवण्यासाठी गणवेशातील पोलीस अधिकारी किंवा इतर विभागांचे अधिकार प्राप्त अधिकाऱ्यांनी वाहनचालकास त्यांचे वाहनात असलेल्या टेक्निकल डिव्हाईस, लाल लाईट किंवा थांबण्याबद्दलची पाटी दाखवून वाहन थांबवण्याचा सिग्नल देऊन वाहन थांबले पाहिजे.