शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

बुडणा-या तरुणीला हायकोर्ट जजने वाचविले

By admin | Published: April 07, 2015 3:51 AM

येथील सुकना तलावात एक तरुणी बुडत असल्याचे दिसताच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी लगेच पाण्यात उडी मारून तिला वाचविल्याची घटना अलीकडेच घडली.

चंदीगड : येथील सुकना तलावात एक तरुणी बुडत असल्याचे दिसताच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी लगेच पाण्यात उडी मारून तिला वाचविल्याची घटना अलीकडेच घडली.३० मार्च रोजी न्या. एम. जेयापॉल नेहमीप्रमाणे तलावाकाठी ‘मॉर्निंग वॉक’साठी गेले होते. काठावर एके ठिकाणी बरेच लोक जमून मदतीसाठी आरडाओरड करीत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता एक मुलगी पाण्यात बुडत असल्याचे त्यांना दिसले. न्या. जेयापॉल यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता लगेच पाण्यात उडी मारली. त्याच्या पाठोपाठ त्यांचा सुरक्षारक्षक यशपाल यानेही सूर मारला. दोघेही पोहत त्या मुलीजवळ गेले तोपर्यंत ती पाण्यात बुडाली होती. दोघांनी मिळून तिला काठावर आणले. नाकातोंडात पाणी गेल्याने शुद्ध हरपलेल्या त्या तरुणीला शुद्धीवर आणून तिची रवानगी इस्पितळात केली गेली.नंतर असे उघड झाले की, त्या तरुणीला परीक्षेत चांगले गुण मिळाले होते; पण गरिबीमुळे वडिलांनी पुढे शिकविण्यास नकार दिल्याने तिने तलावात उडी मारली होती. हे कळल्यावर न्या. जेयापॉल यांनी त्या कुटुंबास तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली व आपल्या सुरक्षा रक्षकाचीही रोख बक्षीस व बढतीसाठी शिफारस केली. (वृत्तसंस्था)