सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, २४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 03:12 PM2020-07-21T15:12:22+5:302020-07-21T15:18:29+5:30
राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये अशी नोटीस बजावली होती.
जयपूर - राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान जयपूर हायकोर्टाने सचिन पायलट यांच्या गटाला अजून काही काळासाठी दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या अपात्रतेच्या नोटिशीविरोधात पायलट गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना जयपूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बंडखोर आमदारांवर २४ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई कऱण्यात येऊ नये, असे आदेश विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांना दिले आहेत. आता या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
Rajasthan HC order on dissident Congress MLAs' petition to be pronounced on Friday
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2020
राजस्थानच्या विधानसभा अध्यक्षांनी पायलट यांच्यासह १९ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये तुमचे सदस्यत्व रद्द का करू नये अशी नोटीस बजावली होती. त्यावर उत्तर द्यायला त्यांनी आमदारांना एका दिवसाची संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यानंतर या आमदारांवर लगेच कारवाई करण्याची शक्यता होती. पण या नोटिशीला पायलट व समर्थकांनी न्यायालयात जे आव्हान दिले होते त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी मंगळवार संध्याकाळपर्यंत अध्यक्षांनी या आमदारांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर राजस्थान हायकोर्टाने आज निकाल दिला.
काँग्रेसमधील तरुण नेत्यांपैकी एक असलेल्या सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेले मतभेद तीव्र झाल्यानंतर बंडाचा झेंडा फडकवला होता. तसेच राजस्थानमधील गहलोत सरकारने बहुमत गमावले आहे, असा दावा पायलट यांनी केला होता. मात्र अशोक गहलोत यांना आपली राजकीय ताकद पणाला लावत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, काँग्रेसने सचिन पायलट यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले होते. तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरूनही हकालपट्टी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी