शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

बालविवाह झालेल्या मुलींच्या वेदनांनी हायकोर्टाला पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:38 AM

बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्या पत्राचे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे.

हैदराबाद : बालविवाह झालेल्या ११ मुलींनी हैदराबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेऊन त्या पत्राचे उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत रुपांतर केले आहे. बालविवाहाची प्रथा रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत तसेच बालविवाह झाल्याने मुलीवर व अपत्याच्या आरोग्यावर जो विपरित परिणाम झाला आहे ,अशांना मदत मिळावी या दुहेरी हेतूने न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.बालविवाह झालेल्या बी महालता व अन्य दहा जणींनी हे पत्र लिहिले असून, त्या साºया जणी १५ ते १९ वर्षे वयोगटाततील आहेत. तेलंगणामध्ये बालविवाहाच्या प्रथेमुळे कोणते दुष्परिणाम झाले आहेत, याची माहिती मुलींनी पत्रात दिली आहे. बालविवाह झालेल्या या मुली हक्कांपासून वंचित असून, लग्नानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे, हे लक्षात आल्यानंतर या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतर केले.बालविवाह झालेल्या मुलींपैकी काही जणी या गरोदरपणात वा बाळंतपणात मरण पावतात. ज्या मुली बाळंत होतात, त्यांच्या अपत्यांना काही आजार असतात. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देशातील बालविवाह झालेल्यांपैकी १८ टक्के मुलींनाही मिळत नाही. या मुलींचे आरोग्याचे प्रश्नही गंभीर असतात. अशा मुलींसाठी आश्रयाची ठिकाणे नाहीत. विपरित परिस्थितीतही त्यांनासासरी जाण्यासाठी माहेरहून दबाव टाकण्यात येतो.यापैकी अनेक मुली लैंगिक अत्याचार, हिंसाचाराच्या बळी ठरतात. त्यांच्या न्यायासाठी न्यायालयात जाण्याचे आर्थिक बळही पालकांकडे अनेकदा नसते. त्यामुळे या मुली निराश होतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.शिक्षणासाठी व्यवस्था हवीबालविवाहाच्या प्रथेचे संपूर्ण उच्चाटन व्हायला पाहिजे. बालविवाह झालेल्या मुलींच्या प्रवेशासाठी सर्व शिक्षण संस्थांनी ५ टक्के जागा राखीव ठेवल्या पाहिजेत. विशेष कौशल्य किंवा नोकरीसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देणारी केंद्रे या मुलींसाठी सुरु करायला हवीत.>... शहरेही अपवाद नाहीतकायद्याने बंदी असली, तरी बालविवाहाची प्रथा आजही भारतात कायम आहे. केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्येच आजही मोठ्या संख्येने मुलींचे बालविवाह होतात असे नाही, तर महाराष्ट्रासारखे राज्यही त्याला अपवाद नाही. नोकरी कामधंद्यानिमित्त गावाकडून शहराकडे स्थलांतर करणाºयांचे प्रमाणही खूप मोठे आहे. लहान-मोठी नोकरी लागलेल्या तरुणाला आपल्या कोवळ््या वयातल्या मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रमाण आजही खूप मोठे आहे. विवाह गावात लागत असतात, परंतु अशी दाम्पत्ये शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.