शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

उच्चशिक्षित विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर, पीएचडी करणारा 'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 10:09 AM

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रीनगर- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे.  ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मन्नानचा हातात ग्रेनेड लाँचर घेतलेला एक फोटो कुपवाड्यात व्हायरल झाला आहे. व्हॉट्स अॅप व फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला असून त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचं या फोटोमध्ये म्हटलं आहे. बशीर अहमद वानी असं मन्नानच्या वडिलांचं नाव असून ते जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात राहतात. मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद हासुद्धा इंजिनिअर आहे. 

‘मन्नानचा फोटो आम्ही पाहिला. गेल्या चार दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. 4 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे मन्नान हरविल्याची तक्रार दाखल केली होती’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं. 

दरम्यान, अलीगड विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा 'स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर' या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतलं. 

‘महिनाभरापूर्वीच माझा भाऊ अलीगडला जाण्यासाठी घरातून निघाला. तो अलीगडलाच असेल असं आम्हाला वाटत होतं. तो रोज आमच्याशी फोनवर बोलत होता. तो या मार्गाला कसा गेला हेच आम्हाला कळत नाही’, असं मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने म्हंटलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून मन्नान विद्यापीठातील राजकारणात सक्रीय होता. विद्यापीठातील निवडणुकांमध्येही त्याने सहभाग घेतला होता. विद्यार्थी संघटनांमधील राजकारणावर त्याने काही लेख लिहीले आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी