ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - महिला दिनी महिला सक्षमीकरण, महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणे, महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी आदी विषयांवर चर्चा झडल्या असताना दिल्लीतल्या मेट्रोमध्ये मात्र, या महिलांपासून वाचवा असं म्हणण्याची पाळी प्रवाशांवर आली होती.
झोपडपट्टीतल्या नाही तर उच्चभ्रू घरातल्या वाटणाऱ्या या महिला मद्यधुंद अवस्थेत होत्या आणि एका माणसाला शिव्याशाप देत होत्या. एका कोपऱ्यात उभं राहून ऐकण्यापलीकडे तो माणूस काहीही करू शकला नाही.
या संपूर्ण दृष्याचं चित्रीकरण झालं असून ते प्रयास राजपाल यांनी सोशल मीडियावर अपलोड केलं आहे, जे तुफान व्हायरल झालं आहे.