लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत आरोग्यावरील लोकांच्या खिशातून होणारा खर्च १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारचाआरोग्यावरील खर्च मात्र सुमारे १३ टक्क्यांनी (१२.८ टक्के) वाढला आहे. ‘राष्ट्रीय आरोग्य खाते २०१९-२०’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य खाते अहवालानुसार, २०१४-१५ आर्थिक वर्षापासून पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार सकल राष्ट्रीय उत्पन्नात सरकारचा आरोग्यावरील होणारा खर्च वाढला आहे. तर लोकांनी स्वत:च्या खिशातून होणारा खर्च कमी केला आहे. हा खर्च ६४.४%वरून घटून ४७.१%वर आला.
आरोग्य सेवा अर्थसाह्य योजनांद्वारे होणारा एकूण आरोग्य खर्च
सरकारने खर्च वाढविला आहे. त्यामुळे या क्षेत्राला सार्वजनिक गुंतवणूकीसाठी सरकारने प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०११ मध्ये एक आराखडा तयार केला होता. त्याआधारे राष्ट्रीय आरोग्य खात्याकडून अहवाल तयार करण्यात येतो, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
₹५.९३ लाख कोटी २०१९-२०
₹७२,०५९ कोटी केंद्र सरकारची हिस्सेदारी
₹१,१८,९२७ कोटी राज्य सरकारांची हिस्सेदारी