नवी दिल्ली: बंगळुरूच्या राजाजीनगरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी एक वाजता मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि कर्नाटक पोलिसांचे फॉरेन्सिक पथक तपासात सुरु आहे.
सदर प्रकरणात रामेश्वरम कॅफेमध्ये अज्ञात बॅग ठेवण्यात आली होती, त्यानंतर काही वेळाने मोठा स्फोट झाला, अशी माहिती समोर येत आहे. राज्य सरकार या घटनेच्या तपासावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आज दुपारी १ वाजता बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा पोलिस सातत्याने तपास करत आहेत. त्यांनी आयपीसीच्या कलम ३०७, ४७१ आणि यूएपीएच्या कलम १६, १८ आणि ३८ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये स्फोटक पदार्थ कायद्याची कलम तीन आणि चार जोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी तपास पथक हजर आहे. एफएसएलचे एक पथक, बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथक बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये तपास करत आहेत.
या घटनेबाबत कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वरा म्हणाले, आम्ही अनेक टीम तयार केल्या आहेत. आम्ही सीसीटीव्ही फुटेजमधून काही पुरावे गोळा केले आहेत. स्फोट झाला तेव्हा बीएमटीसीची बस रस्त्यावरून जाताना दिसली. तो बसने आल्याची माहिती आमच्याकडे आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करू. आमची टीम उत्तम काम करत आहे. स्फोटासाठी टायमरचा वापर करण्यात आला आहे. याचा तपास एफएसएल टीम करत आहे. दुपारी १ वाजता आमची बैठक आहे. सीएम सिद्धरामय्या स्फोटासंदर्भात उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.