हमाल-मापाडींच्या संपाचा पेच कायम
By admin | Published: January 26, 2016 12:04 AM
जळगाव-कृषि उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाडी संघटनेतर्फे भाववाढीसंदर्भात पुकारलेल्या संपावर सोमवारी संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही. हमाल व मापाडी संघटनेने २४ टक्के भाववाढीवर सहमती दर्शविली. तर व्यापारी संघटनेचे नितीन बेहडे व अन्य संचालकांनी २३ टक्केपर्यंत सहमती दर्शविली. कृउबाचे सभापती प्रकाश नारखेडे, संचालक प्रभाकर पाटील, मनोहर पाटील, वसंतराव पाटील यांनी दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींना एक टक्के भाववाढीसाठी संप ताणू नये अशी विनंती केली. त्यानुसार हमाल-मापाडी बांधवांनीदेखील सहमती दर्शविली. मात्र अन्य सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्याबाबत निर्णय जाहीर करू अशी भूमिका जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे व सरचिटणीस शरद चौधरी यांनी घेतली. त्यामुळे २६ रोजी संप मागे घेण्याची शक्यता आहे.