अरेरे! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, संतापलेल्या पत्नीने दोघांना चपलेने धू धू धुतलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:05 AM2024-02-07T11:05:46+5:302024-02-07T11:15:05+5:30

संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली.

high voltage drama between husband wife and girlfriend due to illicit relation satna | अरेरे! प्रेयसीसोबत पतीला रंगेहाथ पकडलं, संतापलेल्या पत्नीने दोघांना चपलेने धू धू धुतलं अन्...

फोटो - आजतक

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पतेरी परिसरात पती-पत्नी आणि प्रेयसीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हायव्होल्टेज ड्रामा सुरू असताना पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. महिला आपल्या माहेरची मंडळी आणि पोलिसांसह एका घरात पोहोचली आणि तिने पतीला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने पतीसोबत उपस्थित असलेल्या अन्य एका महिलेलाही मारहाण केली.

मारहाण करत असलेल्या महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहेत आणि तो तिला घटस्फोट देण्याचा विचार करत आहे. महिलेला याचा त्रास होत होता आणि ती बराच दिवसापासून पती आणि त्याच्या प्रेयसीवर नजर ठेवून पुरावे गोळा करत होती. शेवटी तिने दोघांना रंगेहाथ पकडलं.

संतापलेल्या महिलेने आपल्या पतीला चपलेने मारहाण केलीच पण प्रेयसीलाही बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ महिलेच्या कुटुंबीयांनी बनवला होता, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी ही घटना घडत असताना घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी देखील होते. या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
 
"मी गेल्या तीन वर्षांपासून माहेरी राहत आहे. माझा नवरा मला न्यायला आला नाही. मी स्वत:हून सासरी परत आले. तर तो मला परत का आलीस असा सतत प्रश्न विचारत होता. तसेच पुन्हा माहेरी जाण्यास सांगत होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत माझ्याशी भांडत राहायचा. मग मी एक दिवस रात्री त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. मला संशय आला आणि मी तपास सुरू केला."

"शोध घेतल्यानंतर मला त्याचं अफेअर असल्याचं समजलं. म्हणूनच तो घटस्फोटासाठी माझ्यावर दबाव टाकत होता. शिवीगाळ करत होता. आम्ही आधी त्याच्याविरोधात पुरावे गोळा केले. त्यानंतर मी नवरा आणि त्याच्या प्रेयसीला सतनामध्ये रंगेहाथ पकडलं. अखेर पोलिसांच्या मदतीने दोघांनाही पकडण्यात यश आलं" अशी माहिती महिलेने दिली आहे. 

Web Title: high voltage drama between husband wife and girlfriend due to illicit relation satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.