बिहारच्या दोन सुपुत्रांमध्ये दिल्लीत हाय होल्टेज लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:28 AM2024-05-19T10:28:10+5:302024-05-19T10:28:54+5:30
सहाव्या टप्प्यात दिल्लीची निवडणूक होत असून, २५ मे रोजी मतदान होणार आहे.
डॉ. समीर इनामदार -
नवी दिल्ली: बिहारमधून आलेले मनोज तिवारी (भाजप) आणि कन्हैय्या कुमार (काँग्रेस) हे उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर भिडणार आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीमुळे बदनाम झालेल्या या मतदारसंघात या दोघांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये निवडून आलेले भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी हे यंदा हॅट्ट्रिक करतात का, हे पाहावे लागणार आहे.
गेल्या दहा वर्षांत या भागात केलेल्या विकासकामांमुळे तिवारी यांना विजयाची आशा आहे, विकासकामांच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांचे म्हणणे आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीची निवडणूक होत असून, २५ मे रोजी मतदान होणार आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
या भागात वाहतुकीचे जाळे योग्य नाही. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. स्वच्छतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
अनधिकृत वसाहती आणि पाण्याचा प्रश्न आहे. त्याशिवाय या भागात एकच सरकारी रुग्णालय आहे. सरकारी शाळाही कमी आहेत.
स्थलांतरित भागातील युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असून, सर्वांत दाट लोकवस्तीचा भाग आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
मनोज तिवारी, भाजप (विजयी) - ७,८७,७९९
शीला दीक्षित, काँग्रेस - ४,२१,६९७