शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

वायुप्रदूषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी महाराष्ट्रात; मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 5:49 AM

वायुप्रदूषणामुळे देशात सर्वाधिक १ लाख ८ हजार अपमृत्यू महाराष्ट्रात झाले असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबर्ई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येत आहे. देशात दरवर्षी २४ लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे होतात.

- राजू नायकनिमली (राजस्थान) : वायुप्रदूषणामुळे देशात सर्वाधिक १ लाख ८ हजार अपमृत्यू महाराष्ट्रात झाले असून, देशाची आर्थिक राजधानी मुंबर्ई देशातील सर्वाधिक प्रदूषित महानगर म्हणून पुढे येत आहे. देशात दरवर्षी २४ लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे होतात.राष्ट्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवर आधारित ‘भारतातील पर्यावरणाची सद्य:स्थिती-२०१९’ हा अहवाल मंगळवारी विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला. त्यात महाराष्ट्राने लक्षवेधी प्रदूषणाची पातळी गाठल्याचे म्हटले आहे. महाराष्टÑातील वाढत्या प्रदूषणावर ‘राज्यातील शहरांचा श्वास गुदमरतोय’ असे वृत्त ‘लोकमत’ने २२ जानेवारी रोजी दिले आहे. या वृत्तावर पर्यावरणविषयक अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे.हा अहवाल लवकरच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. पुणेस्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र केंद्राचे संचालक डॉ. गुलफ्रान बेग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीत जरी धुळीचे प्रमाण जादा असले तरी मुंबईत बांधकामावरच्या धूलिकणांसह, वाहनांतून निघणारा धूर, औद्योगिक प्रदूषणातून उद्भवणारे विषारी रासायनिक कण अधिक आहेत. शिवाय, आर्द्रतेमुळेहे विषारी धूलिकण हवेतच तरंगत राहतात.मुंबईबाबत सर्वांत धोकादायक माहिती अशी की, अत्यंत विषारी असलेल्या नायट्रोजन डायआॅक्साइडचे प्रमाण २००७ ते २०१७ या दहा वर्षांत १० टक्क्यांनी वाढले आहे. यातही डोंबिवली, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहरे दिल्ली आणि हावडा यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहेत. नवी मुंबई, ठाणे या महाराष्ट्रातील शहरांनी कानपूर, कोलकाता आणि मिरत यांच्याबरोबर स्थान मिळविले आहे.दिल्ली शहर जरी जादा प्रदूषणाने ग्रासले असले तरी तेथल्या प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १२,३२२ इतकीच आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने या कमी प्रमाणाचे श्रेय न्यायालयीन हस्तक्षेपाला दिले आहे. विस्तारलेल्या आरोग्य सुविधा, नियंत्रणाखाली आलेली वाहतूक व्यवस्था, वाहतुकीवरील निर्बंध आणि वाहनांसाठी नैसर्गिक वायू वापरण्याची सक्ती यामुळे मृत्यूंचे प्रमाण घटले आहे. मात्र, संपूर्ण देशात वायुप्रदूषणामुळे १.२४ दशलक्ष मृत्यूंची नोंद झालेली असून अस्थमा व अन्य श्वसनविषयक रोग, फुप्फुसांचा कर्करोग, हृदयविकार अशा आजारांत या प्रदूषणाची फलनिष्पत्ती होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.प्रदूषण वाढण्यामागची कारणेवाहनांच्या संख्येत झालेली अनियंत्रित वाढ, वाढते औद्योगिकीकरण तसेच शहरीकरणाचा विस्तार पेलण्यासाठी केले जाणारे अनिर्बंध बांधकाम.वायुप्रदूषणाचे स्रोत : वाहनांंचे उत्सर्जन, प्रक्रिया न केलेले औद्योगिक उत्सर्जन, कचऱ्याच्या ढिगाºयांना आग लावल्यामळे होणारे प्रदूषण.दिल्लीमधील वातावरणातील प्रदूषणाचे मोजमाप काढणारी यंत्रणा मुंबई आणि कोलकाताच्या तुलनेत प्रभावी आहे. मुंबईच्या अफाट पसाºयात तर अशा प्रकारची देखरेख ठेवणारी केवळ तीन स्टेशन्स आहेत.वायुप्रदूषणामुळे होणारेराज्यनिहाय अपमृत्यूमहाराष्टÑ १०८०३८तमिळनाडू ६१२०५केरळ २८०५१पंजाब २६५९४दिल्ली १२३२२उत्तराखंड १२०००

टॅग्स :pollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र