मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेटी घाटाचा असून हे भारतातील चित्र आहे, मेरे देश बदल रहा है.. असे लिहून हा फोटो शेअर करण्यात येत आहे. तसेच मोदी सरकारनेच हा भव्य महामार्ग उभारला असल्याचं या फोटोसहित लिहिलेल्या कॅप्शनमधून सांगण्यात येतंय. मात्र, या फोटोमागील सत्य काही वेगळंच आहे. मोदीप्रेमींकडून जाणीवपूर्वक हा फोटो खोट्या कॅप्शनसह व्हायरल करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा हा फोटो फेक असून तो महामार्ग तुर्कीचा आहे. तुर्कीतील मर्सिन-अंतालय महामार्गाचा हा फोटो आहे. मर्सिन आणि अंतालय ही तुर्कीतील दोन मोठी शहरे आहेत. तुर्कीतील भूमध्यसागरीय हे महामार्ग समुद्र किनाऱ्यानजीक आहेत. खाली दिलेल्या व्हिडिओत तुर्कीतील हा महामार्ग दिसत आहे. मात्र, मोदींच्या विकासाचा डंका वाजविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने या व्हिडीओतील महामार्ग मुंबई-गोवा असल्याचं भासविण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर होत आहे. दरम्यान, फेसबुकवरील Vote For BJP, Sangha Mitra, Namo Fan आणि RSS या ग्रुप्सवर आणि फेसबुक पेजवर या महामार्गाचे फोटो टाकून व्हायरल करण्यात येत आहेत.