किणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी (ता. हातकणंगले) येथील ओढ्याच्या पुलाजवळ शॉर्टसर्किटने आग लागून आयशर टेम्पो जळून खाक झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कोल्हापूरहून पुणेकडे कागदी पुठ्ठे घेऊन जाणारा आयशर टेम्पो (एमएच १२ एफझेड ७८५१) घुणकी गावाजवळील ओढ्याच्या पुलाजवळ आला असता पुढील बाजूने शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. हे लक्षात येताच चालक योगेश कांबळे (रा. कुडीत, ता. पुरंदर, जि. पुणे) याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. दरम्यान, आगीचे व धुराचे लोट पसरले होते. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव नगरपालिका व इस्लामपूरच्या राजाराम कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा आग विझवली.दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (वार्ताहर)--------------------फोटो एसटीपी वर १८ किणी नावाने आहे.-----------------------
महामार्गावर घुणकीनजीक धावत्या टेम्पोला आग शॉर्टसर्किटने घटना : महामार्गावरील वाहतूक ठप्प
By admin | Published: December 19, 2014 12:29 AM