शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

महामार्गांवर ‘हायवे व्हिलेज’, ‘हायवे नेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:47 AM

राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक ५0 किलोमीटर्सवर प्रवासी, वाहनचालकांना आहार, विश्रांती, वाहन दुरुस्ती, इंधन पूर्तता, पार्किंग व अन्य सुविधांसाठी ‘हायवे व्हिलेज’ व ‘हायवे नेस्ट’ असे दोन प्रकल्प

सुरेश भटेवरा।नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक ५0 किलोमीटर्सवर प्रवासी, वाहनचालकांना आहार, विश्रांती, वाहन दुरुस्ती, इंधन पूर्तता, पार्किंग व अन्य सुविधांसाठी ‘हायवे व्हिलेज’ व ‘हायवे नेस्ट’ असे दोन प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्र्राधिकरणाच्या (एनएचएआय) अंतर्गत केंद्रीय भूतल परिवहन वाहतूक मंत्रालयाने हाती घेतल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. या योजनेत जमीन मालक, खाजगी क्षेत्रातले विकासक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.५ एकरांपेक्षा मोठ्या जागेवर ‘हायवे व्हिलेज’ तर ५ एकरांपेक्षा कमी जागेवर ‘हायवे नेस्ट’ ३ स्वतंत्र प्रकारांमधे उपरोक्त दोन प्रवर्गांत हे प्रकल्प साकार होणार आहेत. पहिल्या प्रकारात प्रवासी व मोठ्या वाहनांचे चालकांसाठी सुविधा, दुसºया प्रकारात फक्त प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा तर तिसºया प्रकारात फक्त मालवाहतूक करणाºया ट्रकचालकांसाठी सुविधा पुरवणारा हा प्रकल्प राबवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात देशात त्यासाठी १८३ स्थळांवर जमिनींचे अधिग्रहण पूर्ण झाले असून प्रकल्प उभारणीसाठी ३४ स्थळांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय महामार्गालगत एक हेक्टर अथवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जमीनमालकांनी एनएचएआयच्या वेबसाइटवरून २१ सप्टेंबरपर्यंत ई-टेंडर्स भरावेत अथवा एनएचएआयच्या प्रादेशिक कार्यालयात २0 सप्टेंबरपूर्वी दाखल करावेत, असेही गडकरींनी स्पष्ट केले. याखेरीज आॅगस्टअखेरीस आणखी ११९ स्थळांसाठी निविदा काढण्यात येणार आहेत.१०० पूल कोसळण्याच्या अवस्थेत-देशातील १.६ लाख पुलांचे सुरक्षा आॅडिट पूर्ण केले असून, यातील १००हून अधिक पूल मोडकळीस आले आहेत. ते कधीही कोसळू शकतात. त्याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.सावित्री नदीवर घडलेल्या दुर्घटनांसारख्या दुर्घटना रोखण्यासाठी पुलांची माहिती एकत्रित करण्यासाठी परिवहन मंत्रालयाने एक विशेष योजना सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.