शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

हिजाब, हलाल, अजान अन् आता दुकान...; कर्नाटकपासून महाराष्ट्र-दिल्लीपर्यंत राजकारण पेटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 1:17 PM

आधी हिजाब, नंतर हलाल, मग अजान आणि आता दुकान... देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम, असे राजकारण पुन्हा एकदा जोर धरताना ...

आधी हिजाब, नंतर हलाल, मग अजान आणि आता दुकान... देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम, असे राजकारण पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. कर्नाटकात हिजाबवरून सुरू झालेले राजकारणदिल्लीत दुकान बंद करण्याच्या मुद्द्यापर्यंत पोहोचले आहे. कर्नाटकातील हिंदू संघटनांनी हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. याचबरोबर दिल्लीतील मांसाची दुकाने नवरात्रीच्या काळात बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

'नवरात्रीच्या काळात बंद ठेवण्यात यावीत मांसाची दुकानं'नवरात्रीच्या काळात राजधानी दिल्लीमध्ये मांसाची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, असे भाजप म्हणत आहे. एवढेच नाही,  तर दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीच्या महापौरांनी नवरात्रीच्या काळात मांसाची दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी आयुक्त ज्ञानेश भारती यांना पत्र लिहून नवरात्रीच्या काळात मांसाची दुकाने उघडण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे.

मुकेश सूर्यन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, नवरात्रीच्या काळात दुर्गापूजेसाठी जाणाऱ्या भाविकांना मांसाच्या दुकानातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होतो. यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्यामुळे 11 एप्रिलपर्यंत मांसाची दुकाने बंद ठेवण्यात यावीत.

याशिवाय, पूर्व दिल्लीचे महापौर श्याम सुंदर अग्रवाल यांनीही मांसाचे दुकान बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. नवरात्रीच्या काळात मांसविक्रीची दुकाने बंद ठेवायला हवीत, यामुळे आम्हाला आनंद होईल, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, वाद वाढल्यानंतर, आपण केवळ आवाहन केले आहे, असे अग्रवाल म्हणाले.

यावर बोलताना, मांसाचे दुकान बंद ठेवल्याने होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोण करणार? असा प्रश्न हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. तसेच, केवळ 99% नाही तर 100% लोकांकडे मांस खरेदी करायचे, की नाही, हा पर्याय खुला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHinduहिंदूMuslimमुस्लीमKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली