बेलगाव कुर्हे: इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेल्या तीन सिमेंट काँक्र ीट बंधार्याचे जलपूजन सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले.इगतपुरी तालुक्यात पाऊस जरी चांगला झाला असला तरी पावसाचे पाणी आडवने हे मोठे कठीण बनले असतांना जलयुक्त शिवार योजनेच्या मदतीने व इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या विशेष नियोजनातून पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना यशस्वी झाली असून शेतकर्यांना आडवलेल्या पाण्याचे वरदान लाभले आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असलेल्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी वासाळी हे गाव डोंगर दर्यांमध्ये असल्याने येणारे पाणी अडविन्यासाठी याठिकाणी सिमेंट काँक्र ीट बंधारा झाल्यामुळे व त्यातील मोठ्या प्रमाणात गाळ काढल्यामुळे आदिवासी शेतकर्यांची शेती फुलली आहे. डोंगरातून येणारे पाणी हे अजिबात थांबत नसल्याने येथील शेतकरी हताश होते मात्र या पाणी बचतीच्या अभियानामुळे शेतकर्यांना एक जीवदान मिळाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. डोंगराळ भागात तीन सिमेंट काँक्र ीट बंधारे, शेततळे झाल्यामुळे परिसरातील शेतकर्यांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. आहे. नदीपात्रात पाणीसाठा मोठ्या प्रमानात टिकून राहतो. जलयुक्त शिवार योजनेचे काम उत्कृष्ट केल्याबद्दल कृषी सहायक रणजीत आंधळे यांचा सत्कार आ. राजाभाऊ वाजे यांनी केला.यावेळी शिवसेना युवा तालुकाध्यक्ष मोहन बर्हे, पंचायत समतिी सदस्य हरिदास लोहकरे, सुनील वाजे, हरिभाऊ वाजे, साहेबराव झनकर, ज्ञानेश्वर लगड, सरपंच अलका झोले, भगवंता झोले, शिवाजी धांडे, अशोक खाडे, चंद्रकांत गबाले, आनंदा कोरडे, रमेश दराने, किसन बांडे आदी शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी विभागाचे रणजित आंधळे, रु पाली बिडवे, थोरात, पगारे, काळे आदींनी कार्यक्र म यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
सिमेंट काँक्र ीट बंधार्याचे जलपूजन
By admin | Published: September 05, 2016 10:59 PM